Tuesday, 7 October 2014

नांदेड शहरातील परिस्थिति आटोक्यात

नांदेड : अप्रिय घटनांचा निवडणूक काळात गैरफायदा घेतला जाऊ नये, अशी अपेक्षा आहे. तसे झाल्यास अशा घटकांबाबतही वेळीच माहिती द्या. सामाजिक सलोखा व शांतता कायम राखण्यासाठी सहकार्य करा. दरम्यान, सोशल मीडिया व अन्य माध्यमांद्वारे अफवा पसरविणार्‍यांवर सायबर सेलचे लक्ष असल्याचे जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी सांगितले.
शहरातील शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. नांदेडवासियांनी कोणतेही दडपण व दबावाखाली न राहता दैनंदिन व्यवहार सुरळीत ठेवावेत, असे आवाहनही धीरजकुमार यांनी केले आहे. गाडीपुरा भागातील घटनेच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी धीरजकुमार व जिल्हा पोलिस अधीक्षक परमजितसिंह दहीया यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी प्रत्यक्ष घटना परिसराची जाऊन पाहणी केली. यासंदर्भात धीरजकुमार म्हणाले, पोलिस दल व महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या समन्वयातून परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण राखण्यात आले आहे. परंतु अप्रिय घटनांच्या अडून अफवा पसरविणार्‍यांविरूद्ध कठोर कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या दुर्देवी घटनेनंतर कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी संपूर्ण बंदोबस्त असल्याचेही ते म्हणाले. /(प्रतिनिधी) इतवारा पोलिस ठाणे - २३६५१0, सिडको ग्रामीण - २२६३७३, 
वजिराबाद - २३६५00, विमानतळ - २२११00, 
भाग्यनगर - २६१३६४, शिवाजीनगर - २३६५२0 नागरिकांनी संपर्क साधा
शहरातील शांतता व सुव्यवस्थेला बाधा आणू पाहणार्‍या घटकांबाबत जिल्हास्तरीय आचारसंहिता कक्षातील नियंत्रण कक्ष 0२४६२- २४७२४७ या क्रमांकाशी संपर्क साधावा. तसेच खालील क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
नांदेड शहरातील परिस्थिति आटोक्यात 

Saturday, 4 October 2014

Kailash Yadav Whis you Happy Dipavali

दीपावली के इस पावन अवसर पर आप सभी की मनोकामना माँ लक्ष्मी पूरी करे यही कामना के साथ हैप्पी दीपावली आने वाला साल आपके जीवन में खुशिया ही खुशिया लाये माँ लक्ष्मी से यही कामना